श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
शणात येते सरसर शिर्वे शणात फिरुनी ऊन पड़े
वरती बघता इन्द्रधानुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे

झालासा सूर्यास्त वाटतो सांज आहआ तो उघडे
तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पड़े
उठती वरती जलादांवरती अनंत संध्या राग पहा
सर्व नभावर होय रेखिले सुन्दर्तेचे रूप महा

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळची ते
उतुरुनी येती अवनी वरती गृहगोलची की एकमते
फडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरे सावर्ती
सुंदर हिरणी हिरव्या कुरणी निज बालांसह बागडती

खिल्लारे ही चरती राणी गोपही गाणी गात फिरे
मजुल पावा गाय तयाचा श्रावन महिमा एकसुरे
सुवर्णचंपक फुलला विपिनी रम्य केवडा दारवला
पारिजात हे बघता भामा रोष मनिचा मावळला

सुंदर परडी घेउनी हाती पुरोपकंठी शुद्धामती
सुंदर बाला या फूलमाला रम्य फुले पत्री कुरती
देवादार्शना निघती ललना हर्ष माइना हृदयात
वदुनी त्यांचा वाचुनी घ्यावे श्रावण महिन्याचे गीत